मराठी विभाग माहिती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभागाची स्थापना सन १९७० मध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी, तर १९९५ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी करण्यात आली. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन प्रमुख विद्याशाखांमध्ये कला शाखेअंतर्गत मराठी विषय विशेष (Special) आणि सामान्य (General) स्तरावर शिकवला जातो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या अनुषंगाने विभाग बहुविध शैक्षणिक संधी, कौशल्य विकास, संशोधनवृत्ती आणि रोजगाराभिमुख शिक्षण यावर भर देतो. विद्यार्थ्यांची विश्लेषणात्मक क्षमता, भाषिक अभिव्यक्ती आणि सृजनशीलता वाढवण्याच्या दृष्टीने अध्यापन व अभ्यासक्रमाची रचना केली जाते. या विभागाचे पहिले प्रमुख दिवंगत माजी प्राचार्य डॉ. व्ही. डी. कासार होते. त्यानंतर विभागात प्रा. कटारे, प्रा. देशमुख, प्रा. कु. रोहिणी जोशी, डॉ. बी. टी. शेळके आणि डॉ. जे. पी. खाडे यांनी विभाग प्रमुख म्हणून मोलाचे योगदान दिले आहे. सध्या विभागप्रमुख म्हणून प्रा. डॉ. वंदना विनायक नढे कार्यरत असून त्या मराठी विभागाचे शैक्षणिक आणि प्रशासकीय नेतृत्व समर्थपणे सांभाळत आहेत. मराठी विभागाची शिक्षणपद्धती विद्यार्थी-केंद्रित असून नव्या तंत्रज्ञानाचा समावेश, स्थानिक व जागतिक साहित्यिक प्रवाहांचे आकलन, तसेच भाषा-संस्कृतीचा सखोल अभ्यास घडवून आणण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न विभागाकडून केला जातो.
प्राध्यापक माहिती
- नाव - प्रा. डॉ. वंदना विनायक नढे
- शैक्षणिक अर्हता - एम.ए., बी.एड., नेट, पी.एचडी.
- पद - प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख
- विषयातील प्राविण्य - लोकसाहित्य, ग्रामीण, स्त्रीवादी साहित्य
- अनुभव - १७ वर्ष
- ई मेल - nadhev@yahoo.com
- Curriculum Vitae - View more
- नाव - Dr. Ranjana Kantilal Purane
- शैक्षणिक अर्हता - एम.ए., नेट, पी.एचडी.
- पद - सहाय्यक प्राध्यापक
- विषयातील प्राविण्य - कादंबरी, कथा, स्त्रीवादी साहित्य
- अनुभव - ०१ वर्ष
- ई मेल - v.desai444@gmail.com
- Curriculum Vitae - View more
- नाव - प्रा. विष्णू एकनाथ घोडे
- शैक्षणिक अर्हता - एम.ए., बी.एड., सेट
- पद - सहायक प्राध्यापक
- विषयातील प्राविण्य - मध्ययुगीन कालखंडातील मराठी साहित्य
- अनुभव - ०७ वर्ष
- ई मेल - veghode16@gmail.com
- Curriculum Vitae - View more
शैक्षणिक अभ्यासक्रम रचना आणि अभ्यासक्रम
वाणिज्य व विज्ञान विद्याशाखांमध्ये पदवीस्तरावर मराठी अभ्यासक्रम
विभागातील सुविधा
आयसीटी / इलेक्ट्रॉनिक साधने
- लॅपटॉप
- संगणक
- प्रिंटर
इंटरनेट सुविधा
- विभागाच्या सर्व संगणक आणि लॅपटॉपसाठी इंटरनेट सुविधा (लॅन आणि वाय-फाय) आहे.
विभागातील ग्रंथालय
- ३०० हून अधिक पाठ्यपुस्तके
- संदर्भ पुस्तके
Other Information Of Department
- साहित्यप्रकारांचा मूलभूत अभ्यास: कथा, कादंबरी, काव्य, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या विविध साहित्यप्रकारांचा मूळ घटक म्हणून अभ्यास.
- लेखक व लेखनशैलीचा अभ्यास: मराठी साहित्यातील लेखकांच्या लेखनशैलीचे विश्लेषण.
- ग्रामीण साहित्याचे वैशिष्ट्य: ग्रामीण बोलीभाषा व जीवनशैली यांचा अभ्यास. ग्रामीण साहित्यातून सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे दर्शन.
- दलित, आदिवासी व नागरी स्त्रीजीवनाचे विश्लेषण: विविध समाजघटकांतील स्त्रियांचे साहित्यिक चित्रण व त्याचे विश्लेषण.
- लेखकाच्या विविध साहित्यप्रकारांचा तुलनात्मक अभ्यास: एकाच लेखकाच्या ग्रामीण आणि दलित साहित्याचा तुलनात्मक अभ्यास.
- साहित्याचे वैशिष्ट्य व भाषिक वेगळेपणा: लेखनशैली, भाषा, आशय, मांडणी यामधील वैशिष्ट्ये व विविधता.
- लोकपरंपरा व बोलीभाषेचा अभ्यास: सभोवतालच्या परिसरातील लोकपरंपरा, लोक रुढी, बोलीभाषेचे विश्लेषण.
- ऐतिहासिक स्रोतांचे साहित्यिक संदर्भ: शिलालेख, दस्ताऐवज, संत, पंत, तंत यांचे साहित्य व त्यातील वैविध्य.
- साहित्याचा सामाजिक, मानसिक व आर्थिक विश्लेषण: साहित्याच्या माध्यमातून समाजाचे विविध स्तरांतील प्रतिबिंब.
- इतर भाषांतील प्रभाव: मराठी भाषेत आलेले इतर भाषेतील शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांचे वेगळेपण.
- समाजातील घटनांचे साहित्यिक प्रतिबिंब: साहित्याच्या माध्यमातून समाजात चाललेल्या घटनांचे विश्लेषण.
| प्राध्यापकाचे नाव | शोधनिबंधाचे नाव | जर्नलचे नाव | प्रकाशन वर्ष |
|---|---|---|---|
| डॉ. वंदना विनायक नढे | १९९० नंतरची देवदासी विषयक कविता | आयडीएल | मार्च – ऑगस्ट २०२४ |
| वृत्तपत्राची भाषा | विद्यावार्ता | एप्रिल- जून २०२४ | |
| निवेदन कौशल्य | अक्षरा | एप्रिल २०२४ | |
| साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त स्त्रीलेखिकांच्या साहित्याचा अभ्यास | बी.आधार | मार्च २०२४ | |
| समकालीन साहित्यातील गौरी देशपांडे यांच्या कथांचे स्वरूप | बी.आधार | मार्च २०२४ | |
| लोकनाट्य कलावंत स्त्रीचे सबलीकरण | संस्कृती | जाने-फेब्रु-मार्च २०२४ | |
| लोकनाट्य- तमाशा | अक्षरा | जाने-मार्च २०२४ | |
| राजमाता जिजाऊ- बहुआयामी व्यक्तिमत्व | पॉवर ऑफ क्नॉलेज | जाने-मार्च २०२४ | |
| संत ज्ञानेश्वरांचे समाजप्रबोधन | ओपस् प्बलिकेशन,दिल्ली | मार्च-२०२3 | |
| मानवाधिकार आणि महिला सबलीकरण | बी.आधार महिला सक्षमीकरण : समस्या आणि आव्हाने | ऑगस्ट- २०२१ | |
| लोकसाहित्य विषयक संशोधन | प्रिंटींग एरिया | ऑगस्ट- २०२१ | |
| शरद पवार यांचे महिला धोरण | प्रिंटींग एरिया | एप्रिल-२०१९ | |
| पारधी जमात | रिसर्च जर्नी | मार्च- २०१९ | |
| डॉ. वर्षा देसाई | पटकथा लेखन | रिसर्च जर्नी | जाने -२०१९ |
| स्त्रियांच्या कादंबरीतील पुरूष | मासिक | डिसेंबर, २००८ | |
| स्त्रियांच्या अंतर्मनाचा वेध घेणारी कादंबरी: रीटा वेलिंणकर | मासिक CONTEMPORARY RESEARCH IN INDIA (Peer Reviewed Journal) | मार्च,२०२१ | |
| मानवी भावभावनाची निखळ अभिव्यक्ती: पत्रबद्ध साहित्य | मासिक | जुले, २०१३ | |
| स्त्रीवाद आणि त्याची सैद्धांतिक मांडणी | समीक्षा पुस्तक | मार्च २०२२ | |
| रीटा वेलिणकर सामाजिकतेचे पैलू | Sanskruti International Multidisciplinary Research Journal | मार्च,२०२४ | |
| आदिवासी साहित्य स्वरूप आणि प्रेरणा | समीक्षा पुस्तक | सप्टेंबर २०२१ | |
| महाराष्ट्रातील ख्रिस्ती संप्रदाय | समीक्षा पुस्तक | मे २०२२ | |
| स्त्रीवादी कादंबरीतून येणारे महानगरीय जीवन | समीक्षा पुस्तक | जानेवारी २०२३ | |
| स्त्री स्वातंत्राचे उद्घाते: महात्मा बसवेश्वर | समीक्षा बूक | जानेवारी २०२५ | |
| स्त्रियांच्या कादंबरीतील पुरूष | मासिक | डिसेंबर, २००८ |
संपादित केलेली पुस्तके
| पुस्तकांचे शीर्षक | प्रकाशन वर्ष व प्रकाशक | लिखित /संपादित |
|---|---|---|
| स्त्रियांचे लोकगीत ISBN- 978-93-90-976-56-0 | बी.यु.यु.के.एस प्रकाशक (२०२०-२०२१) | संपादक: डॉ. वंदना विनायक नढे |
| मराठीतील स्त्रीधन – उखाने N-978-93-91305-79-0 | आधार प्रकाशक, अमरावती (२०२०-२०२१) | संपादक: डॉ. वंदना विनायक नढे |
| जुन्नर तालुक्यातील प्रचलित म्हणी व वाक्प्रचार ISBN-978-93-92576-82-9 | अक्षरा प्रकाशक, भुसावळ (२०२३-२४) | संपादक: डॉ. वंदना विनायक नढे |
प्रकाशित पुस्तके
| पुस्तकांचे शीर्षक | प्रकाशन | प्रकाशनाचे वर्ष | लिखित /संपादित |
|---|---|---|---|
| ‘स्त्रीवादी दृष्टीकोणातून कादंबऱ्यांचा अभ्यास’ (‘नग्न प्रश्न’ व ‘रीटा वेलिणकर’च्या अनुषंगाने) | समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर | ऑगस्ट, २०२१ | डॉ. वर्षा देसाई |
| महानगरीय साहित्य : स्वरूप व विशेष | समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर | जानेवारी, २०२३ | संपादित: डॉ. वर्षा देसाई |
लेख
| पुस्तकांचे शीर्षक | लेखक/ कवी | प्रकाशक | प्रकाशनाचे वर्ष |
|---|---|---|---|
| महानगरीय साहित्य : स्वरूप आणि विशेष | लेखक: डॉ. वंदना विनायक नढे | समिक्षा पब्लिकेशन, सोलापूर | जाने २०२३ |
| नाणेघाटातील पाऊलखुणा | कवी: डॉ. वंदना विनायक नढे | यशोदिप पब्लिकेशन, पुणे | मे २०२३ |
| महानुभाव संप्रदाय : स्वरूप आणि विशेष | लेखक: डॉ. वंदना विनायक नढे | प्रभाकर पब्लिकेशन, लातूर | ऑक्टो २०२३ |
To nurture literary and linguistic skills, the department conducts a range of engaging activities every year:
- ‘Sat-Chat’ – A weekly group discussion session aimed at enhancing students’ critical thinking and communication skills.
- Essay Writing Contest – Encouraging analytical and creative expression through structured writing.
- Elocution Contest – Developing public speaking abilities and persuasive communication.
- Story Presentation Contest – Enhancing storytelling skills and creative narration.
- Lectures by Eminent Scholars – Providing students with insights from distinguished academicians and literary figures.
- Publication of ‘The Collegian’ – Showcasing student creativity, literary works, and academic insights.
- Student Participation in Various Contests at Other Colleges – Encouraging students to engage in intercollegiate competitions, enhancing their exposure and confidence.
- Lecture Series on Entrepreneurship under C.P.E. – Organizing expert talks to promote entrepreneurial skills and career development among students.
- प्रा. विष्णू एकनाथ घोडे फेब्रुवारी २०२१ मध्ये सेट (SET) परिक्षा उतीर्ण.
- गणेश चिमटे हा विद्यार्थी भारतीय आर्मीत भरती.
- नम्रता पारखे ही विद्यार्थीनी पुणे पोलिस मध्ये भरती.
- प्रतीक गवारी हा विद्यार्थी होम गार्ड मध्ये भरती.
- विद्यार्थ्यांनी संकलित केलेले लोकसाहित्य मराठी विभागाने पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे.
Coming Soon…
Coming Soon…
Photo Gallery
मा. तानाजी बोऱ्हाडे आणि मा. प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मराठी स्वाक्षरी दिन: मा. सौ. कांताताई मस्करे, अध्यक्ष प्रतिनिधी मा. विलास कुलकर्णी, मा. प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे, मा. उपप्राचार्य डॉ. रविंद्र चौधरी
संपादित केलेल्या पुस्तकांचे मा. प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे व मा. सरिता कलढोणे व टी.वाय. बी.ए.चे विद्यार्थी यांचे हस्ते प्रकाशन




